विजयानगर साम्राज्य
विजयानगर साम्राज्य : दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध साम्राज्य. इ. स. १३३६ मध्ये कर्नाटकातील विद्यमान बेल्लारी जिल्ह्यात होस्पेट तालुक्यातील ⇨हंपी(विजयामगर) येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस संगमाचे पुत्र ⇨पहिला हरिहर (कार. १३३६−५६), ⇨पहिला बुक्क (कार. १३५६−७७), मुद्दण, मारप्पा व कंपण या पाच बंधूंनी या राज्याची स्थापना केली.